Devika Kelkar Travels

Facebook Linked IN Google Plus Trip Adviser You Tube


Japan Tours

Japan- The Land Of Rising Sun...

जपान देश पाहावा हे बरेच जणांचे स्वप्न आहे आणी त्याला कारण पण आहे...काय नाहीये त्या देशात...
लहानापासुन मोठ्या माणसापर्यत सर्वांना आकर्षित करतो जपान.
देविका केळकर आयोजित जपान टुर ज्यापनीज भाषा येणार्या माणसाबरोबर,त्यामुळे भाषेचा प्रश्न नाही,तुम्ही सहलीचा मनसोक्त आनंद घ्या.
नाजूक सुंदर साकूरा(चेरी ब्लॉसम)चा देश.
सामुराई, निंज्याच्या वेगळ्याच वातावरणात घेऊन जाणाऱ्या इतिहासाचा देश.
स्वताच्या वैशिष्ठ्यामुळे आशिया मध्ये उठून दिसणारा उगवत्या सूर्याचा देश....जपान

जपानचे वर्णन करताना कितीतरी गोष्टी सांगता येतील.
एखादया कॅलिडिओस्कोप प्रमाणे जसे फिरवावे तसे नवे रंग.
ज्यांना विज्ञान,तंत्रज्ञानात रस आहे,त्यांच्या साठी जपानी कंपन्या,मशिन्स,रस्ते बघण्यासारखे खूप आहे.
इतिहास प्रेमींसाठी क्योतो,नारा मधले राजवाडे, बुध्दमंदिरे,श्राईन्स बघायला दिवस कमी पडतील.
निसर्गप्रेमींसाठी तर निसर्गसौंदर्याचा खजिना आहे जपान.
खाद्यपदार्थ पण आहेत फक्त चवीची सवय होईपर्यंत थोडा वेळ जातो.
खरेदीसाठी जपान महाग वाटेल पण जपानी क्वालिटी कुठेच मिळणार नाही.पंखा,किचेन, लाकडाच्या कोरीव वस्तू भेट दयायला एकदम योग्य. माहितगार बरोबर असेल तर खिश्याला परवडणारे.
पुस्तकातून वाचलेला जपान आता खूप लांब राहिला नाहिये.
जपानचे अंतरंग बघण्याची ईच्छा असलेल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत

JAPAN CALLING
अर्थातच जपानची टूर.सगळ्या सिझन च्या जपान टुर्स...
आमची खासीयत-
* Home to Home Pacakge.
* All Inclusive.
* No Hidden Charges.
* Japanese Language Speaking Tour Manager On Tour.
जपानला जाण्याआधी जपानची माहिती देणे, व्हिडीओ दाखवणे अशी पूर्वतयारी या ग्रूपच्या माध्यमातून करणार आहोत.
तर मग चला तर जाऊया जपानच्या सफरीला.....Alpine Route - Japan Tour

Alpine Route - Japan Tour

Duration : 6 Nights / 7 Days

Package Cost : On Request

Destination Covered : Kansai Airport - Osaka - Kyoto - Toyoma - Tateyama - Matsumoto - ..

View Details Book Your Tour

Cherry Blossom Special - Japan Tour

Cherry Blossom Special - Japan Tour

Duration : 8 Nights / 9 Days

Package Cost : INR 205000 / person

Destination Covered : Narita - Tokyo - Hakone - Mount Fuj - Kyoto - Nara - Hiroshima - ..

View Details Book Your Tour


Contact Now

+91-9763239892